महाराष्ट्रातील समाजसुधारक
- जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ(इ.स.१८०३-१८६५ ) -
- मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट (आचार्य अत्रे)म्हणून ओळखले जातात.
- जन्म -मुरबाड (ठाणे)
- मुंबईचे गव्हर्नर एलफिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी "बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी" स्थापन केली.
- "स्टुडंट लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी" च्या स्थापनेसाठी मोठी आर्थिक मदत.
- ब्रिटीश सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या "बोर्ड ऑफ एज्युकेशन" चे सदस्यत्व बहाल केले, त्याचेच पुढे शिक्षण खात्यात रुपांतरीत झाले.
- मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचा सहभाग.
- दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांच्या समवेत "बॉम्बे असोसिएशन" या संस्थेची स्थापना.
- एलफिन्स्टन कॉलेज सुरु केले.
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर (इ.स. १८१२ - १८४६) -
- जन्म - ६ जानेवारी १८१२ रोजी पोंबर्ले (रत्नागिरी)
- आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक इ. नावाने संबोधतात.
- डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी, एल्फीन्स्टन कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर इ पदावर काम केले.
- सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक.
- १८३२ मध्ये त्यांनी 'दर्पण' हे मराठीतले पहिले वृत्तपत्र सुरु केले तसेच 'दिग्दर्शन' हे मासिक सुरु केले.
- शून्यलब्धी, हिंदुस्थांनचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, सर संग्रह इंग्लंडचा इतिहास इ. ग्रंथ त्यांनी लिहिले.
- दादोबा पांडुरंग तर्खडकर(इ.स. १८१४ - १८८२) -
- जन्म- मुंबई
- मराठी भाषेचे व्याकरणकार उर्फ पाणिनी म्हणून परिचित.
- सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा पुरस्कार
- जावरा संस्थानच्या नवाबाचे शिक्षक, एल्फीन्स्टन संस्थेत सुरात येथे शिक्षक, १८१६ ला ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी निवड, १८५२ मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची निवड, बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून काम.
- भिल्लांच्या बंडाचा बिमोड त्यांनी कुशलतेने केल्यामुळे त्यांना सरकारने "रावबहादूर" हि पदवी दिली.
- आपल्या समाजातील दोष व उणीवा या जाणीवेतूनच १८४४ मध्ये त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर दलपतराय इ. च्या सहकार्याने 'मानवधर्म सभा' स्थापन केली. कार्यकर्त्यांच्या अभावामुळे फार काळ टिकू शकली नाही.
- त्यानंतर भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीने मुंबई येथे १८५९ मध्ये 'परमहंस सभा' स्थापन केली.यातूनच पुठे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली.
- गोपाल हरी देशमुख उर्फ लोकहितवादी (इ. स. १८२३ - १८९२) -
- जन्म - पुणे
- सर्वांगीण सुधारणेचे 'आद्यप्रवर्तक'.
- दुभाषी, मुन्सफ,इनाम, कमिशनर, जज्ज इ पदावर काम केले.
- सरकारकडून 'रावबहादूर' पदवी.
- भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' या साप्ताहिक मध्ये त्यांनी हिंदु समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला 'शतपत्रे' असे म्हणतात.
- लक्षीज्ञान, गीतातत्व, जातीभेद, भरतखंडपर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास पानिपतची लढाई, कलियुग इ. ग्रंथ लेखन.
- काळानुसार
धर्मात व चालीरीतीत वादळ करावेत, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांना शिक्षण व
बरोबरीचे स्थान द्यावे, आळशीपणा सोडून उद्योगी बनावे, स्वशासन पद्धती,
प्रवृत्तीवादी होणे या सर्व मार्गांनी समाजसुधारणा होऊ शकतात हे त्यांनी
शिकवले म्हणूनच त्यांना लोकहितवादी ओळखले जातात.
- भाऊ दाजी लाड उर्फ रामचंद्र विठ्ठल लाड (इ.स. १८२४ - १८७४ ) -
- जन्म - मांजरे (गोवा)
- एल्फीन्स्टन इंस्टिट्युट मध्ये विज्ञानचे शिक्षक म्हणून काम केले.
- कुष्ठरोगावर एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे त्यांना 'धन्वंतरी' म्हणून ओळखले जाते.
- त्यांनी ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले.
- स्त्री शिक्षणाचा प्रयत्न, मुंबई विद्यापीठच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार, विधवा विवाह्चा पुरस्कार इ.
- दादा नौरोजी, जगन्नाथ शंकरशेठ यांच्या सोबत १८५२ मध्ये "बॉम्बे असोसिएशन" ही संघटना स्थापन केली. भारतातील राजकीय स्वरुपाची ती पहिली संघटना होती.
- भाऊ महाजन कुंटे (इ.स. १८१५ - १८९०) -
- जन्म - पेण (कुलाबा- रायगड)
- "दर्पण" व "दिग्दर्शन" मध्ये लेखन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर याचे वर्गमित्र.
- त्यांनी 'प्रभाकर' नावाचे साप्ताहिक सुरु केले.
- धूमकेतू व ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयांवर लेखन केले.
- विष्णुबुवा ब्रम्हचारी उर्फ विष्णु भिकाजी गोखले (इ.स. १८२५ - १८७१) -
- जन्म - शिरवली (रायगड)
- विष्णुबुवांनी 'वर्तमानदीपिका' या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.
- त्यांनी 'भावार्थ सिंधू', 'वेदोक्त', 'धर्मप्रकाश', 'सुखदायक', 'राज्यप्ररणी निबंध', 'सहजस्थितीचा निबंध', 'बोधसागर रहस्य', 'सेतुबंधानी टीका' इ. ग्रंथ.
- महात्मा जोतीबा फुले (इ.स. १८२७ - १८९० ) -
- जन्म - पुणे
- आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते.
- इ.स. १८४८ मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
- इ.स. १८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली.
- विधवा पुनर्विवाहास चालना, इ.स. १८६४ मध्ये पुण्यात पुनर्विवाह घडवून आणला.
- पुण्यात स्वतःच्या घरी "बालहत्या प्रतिबंधगृहा"ची स्थापना केली.
- इ.स.
१८८८ मध्ये व्हिक्टोरीया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात त्यांनी
'शेतकऱ्यांचे प्रतिनिधी' म्हणून पारंपारिक पोषखात उपस्थित राहून
शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले.
- हंटर
कमिशनपुढे (जालियानवाला बाग हत्याकांड साठी नेमलेली चौकशी समिती )प्राथमिक
व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली.
- 'शेतकऱ्यांचा असूड' 'गुलामगिरी', ब्राम्हणाचे कसब, तृतीय रत्न(नाटक) इ. ग्रंथ.
- सावित्रीबाई फुले (इ.स. १८३१ - १८९७) -
- जन्म - नायगाव (सातारा)
- महाराष्ट्रीतील पहिली स्त्री शिक्षिका. महात्मा फुलेंच्या कार्यात मोलाची साथ.
- बाबा पदमनजी मुळे (इ.स. १८३१ - १९०६) -
- जन्म - बेळगाव
- परमहंस सभेचे सक्रीय सदस्य, विधवा पुनर्विवाहचे पुरस्कर्तॆ.
- "अरुणोदय" आत्मचरित्र, "यमुना पर्यटन" या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली.
- इंग्लिश - मराठी व संस्कृत - मराठी इ शब्दकोष लिहिले.
- विष्णुशास्त्री पंडित (इ.स. १८२७ - १८७६) -
- जन्म - सातारा
- 'इंदूप्रकाश' या साप्तहिकाचे संपादक.
- "पुनर्विवाह उत्तेजक मंडळी"या सभेची स्थापना केली.
- ईश्वरचंद विद्यासागर यांच्या "विधवा विवाह" या ग्रंथाचा मराठीत अनुवाद.
- ब्राम्हण
कन्या विवाह विचार, पुरुष सुक्त व्याख्या,विधवा विवाह, हिंदुस्थानचा
इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व
मराठी कोश इ. निवडक ग्रंथ.
- सार्वजनिक काका उर्फ वासुदेव गणेश जोशी (१८२८ - १८८०) -
- जन्म - सातारा
- सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ.
- वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले.
- भारतात
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मार्गाने कार्य करणारी
सार्वजनिक सभा औंधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या
अध्यक्षतेखाली १८७० मध्ये स्थापन झाली.
- न्या. रानडे व सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक आणि राजकीय स्वरूप दिले.
- वृत्तपत्रेचे स्वातंत्रतेचे पुरस्कर्ते, स्वदेशीचा पुरस्कार, लघुउद्योगाचा आग्रह, धर्मातील भेदाला विरोध.
- डॉ. रा. गो. भांडारकर (इ.स. १८३७ - १९२५) -
- जन्म -मालवण (सिंधुदुर्ग)
- हिंदु धर्मातील मूर्तीपूजा, अवतारकल्पना, बहुदेवतावाद इ. विरोध
- बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह समंती, वयाचा कायदा इ. सामाजिक सुधारणांचा आग्रह
- स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मद्यपानबंदी, देवदासी प्रथा बंदी इ. सामाजिक सुधारणेचा पुरस्कार.
- मुंबई प्रांताचे लेजीस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य, केंद्रीय लेजीस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य,
- अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन, वैष्णविझम, हिस्टरी ऑफ इंडिया इ. विपुल ग्रंथ संपदा.
- बेहरामजी मलबारी (इ.स. १८५३ - १९१२) -
- जन्म - बडोदा
- बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक, विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक, समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी
- समाजातील विधवांचे प्रश्न आणि अकाली प्राप्त होणारे वैधव्य याला बालविवाह पद्धती जबाबदार आहे हे विचार तानी समाजासमोर मांडले.
- त्यांनी 'इंडिअन स्पेक्टॅटर' हे साप्ताहिक सुरु केले
- दादाभाई नौरोजी यांच्या 'व्हाइस ऑफ इंडिया' नियतकालिकात लेखन.
- त्यांनी दयाराम गीडूमल यांच्या मदतीने 'सेवासदन ' ही संस्था स्थापन केली.
- गुजराथ अॅण्ड गुजराथीज, नीती विनोद इ. ग्रंथ
- गो. ग. आगरकर (इ.स. १८५६ - १८९५) -
- जन्म - टेंबू (कराड)
- सामाजिक सुधारणा ,व्यक्तिस्वातंत्र व बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करणारे विचारवंत
- विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक यांच्या मदतीने पुणे येथे " न्यू इंग्लिश स्कूल" ची स्थापना केली.
- केसरीचे संपादन,लो. टिळक आणि इतरांच्या समवेत आगरकरांनी ''डेक्कन एज्युकेशन सोसायटी" ची स्थापना केली. याच संस्थेच्या वतीने "फर्ग्युसन कॉलेज" सुरु केले. या कॉलेज चे प्रिन्सिपाल होते.
- अगोदर सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा यावरून केसरीचे संपादन सोडून "सुधारक" हे वृत्तपत्र लोकजागृतीसाठी सुरु केले.
- केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील वेचक लेख, वाक्य मीमांसा, वाक्याचे पृथक्करण इ ग्रंथाचे लेखन
- पंडिता रमाबाई ( इ. स. १८५८ - १९२१) -
- जन्म - गंगामुळे (मंगळूर-कर्नाटक)
- पुण्यात स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी १८८२ मध्ये "आर्य महिला समाज" ची स्थापना
- हंटर कमिशनपुढे साक्ष देताना स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला.
- स्त्रियांसाठी केलेले महत्त्वाचे कार्य म्हणजे "शारदा सदन" ची स्थापना (१९८९ मध्ये) मुंबईत केली.
- या सदनात निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था.
- केडगाव मध्ये त्यांनी "मुक्तिसदन" नावाची संस्था सुरु केली. त्यात अनाथ व विधवा स्त्रीयांच्या शिक्षणाची निवासाची आणि भोजनाची मोफत सोय केली.
- "बायबलचे मराठीत भाषांतर", "स्त्रीधर्मनिती", "दि हाय कास्ट हिंदु वूमन" इ. ग्रंथ
- न्या. महादेव गोविंद रानडे ( इ.स. १८४२ - १९०१ ) -
- जन्म - निफाड (नाशिक)
- एलफिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी आणि इतिहास विषयाचे प्राध्यापक
- न्यायाधीश(पुणे), कायदेमंडळाचे सदस्य.
- आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. हिंदू धर्मातील शोध दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रार्थना सभेमार्फत केला.
No comments:
Post a Comment