Pages

Friday, 22 August 2014

महाराष्ट्रातील समाजसुधारक

  •  जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ(इ.स.१८०३-१८६५ ) -  
    • मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट (आचार्य अत्रे)म्हणून ओळखले जातात.
    • जन्म -मुरबाड (ठाणे)
    • मुंबईचे गव्हर्नर एलफिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी "बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी" स्थापन केली.
    • "स्टुडंट लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी" च्या स्थापनेसाठी मोठी आर्थिक मदत.
    • ब्रिटीश सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या "बोर्ड ऑफ एज्युकेशन" चे सदस्यत्व बहाल केले, त्याचेच पुढे शिक्षण खात्यात रुपांतरीत झाले.
    • मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचा सहभाग.
    • दादाभाई नौरोजीभाऊ दाजी लाड यांच्या समवेत "बॉम्बे असोसिएशन" या संस्थेची स्थापना.
    • एलफिन्स्टन कॉलेज सुरु केले.
  •  आचार्य बाळशास्त्री जांभेकर (इ.स. १८१२ - १८४६) - 
    • जन्म - ६ जानेवारी १८१२ रोजी पोंबर्ले (रत्नागिरी) 
    • आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक इ. नावाने संबोधतात.
    • डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी, एल्फीन्स्टन कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर इ पदावर काम केले.
    • सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक.